Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महिला उद्योजिका मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला उद्योजिका मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद 

महिला उद्योजिका मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी -9 जानेवारी 2025 रोजी धनकवडी पुणे येथे सौ.सोनाली तुषार कोदे आणि सौ. कोमल पारेख अशा दोघी व्यावसायिक महिलांनी इतर छोट्या व्यावसायिकांना मदत व्हावी या उदात्त हेतूने व्यावसायिक मेळावा आयोजित केला होता.प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.महिलांना मानसिक आधार देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.महिलांना कुटुंब सांभाळून, आपल्या वेळा सांभाळून व्यवसाय करता येऊ शकतो. 

यावेळी दंताळे ज्वेलर्स यांनी येऊन व्यावसायिक महिलांना छान गिफ्ट दिले.तसेच लिनेस क्लब ऑफ पुणे सिंहगड दर्शन प्रेसिडेंट लिनेस वर्षा सतीश गवते मॅडम यांनी सुध्दा व्यावसायिक महिलांना मार्गदर्शन केले.स्वतः च्या व्यावसायाची माहिती सर्व महिलांनी यावेळी दिली आणि खरेदी विक्री सगळयांची झाली. यावेळी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.

विजेत्याना आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.50 हून अधिक महिलांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शविली.सामाजिक परिस्थिती, स्त्रियांपुढची बदलत जाणारी आव्हानं  त्याचवेळी भविष्यात येणाऱ्या नवीन बदलांचा वेध अशा व्यावसायिक संधीमुळे उपयोगाचा ठरत आहे.त्यामुळे त्यातील निर्माण होणाऱ्या संधींचा शोध घेता येतो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket