नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई पोलीस व गुन्हे शाखेची दमदार कामगिरी एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह एकाच्या मुसक्या आवळल्या

वाई पोलीस व गुन्हे शाखेची दमदार कामगिरी एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह एकाच्या मुसक्या आवळल्या

वाई पोलीस व गुन्हे शाखेची दमदार कामगिरी एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह एकाच्या मुसक्या आवळल्या

65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई पोलिसानी कुणाल सकटे या सराईत आरोपीकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूसे असा 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वाई पोलीस व गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे.

 

 वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांस त्यांच्या खास खबऱ्यामार्फत बातमी प्राप्त झाली की, एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाणे हद्दमधील रविवार पेठमधील मांगखळी येथे विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. सदर माहिती प्राप्त होताच वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथकास सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचुन सदर संशयित आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. प्राप्त बातमीच्या आधारे वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवारपेठ वाई मधील मांगखळी येथील मणेश्वर ओढ्याचे जवळ सापळा लावला असता सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रितीने फिरतांना दिसला त्याचा वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव कुणाल सकटे रा. रविवारपेठ वाई ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याचेवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेला ०१ देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टचे खिशात ०२ जिवंत काडतुसे असा एकुण ६५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नाव्हेंबर २०२२ पासून ते आज अखेर १०७ देशी बनावटीची पिस्टल ०४ बारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री श्याम पानेगांवकर परि. पोलीस उपअधिक्षक वाई पोलीस ठाणे. सहा पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक ए.बी. सुर्वे पोलीस अंमलदार. प्रसाद दुदुस्कर, पो.शि. नितीन कदम, पो. शि. राम कोळी, पो.शि. हेमंत शिंदे, पो.शि. श्रावण राठोड, पो. शि. विशाल शिंदे यांनी केली आहे. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket