नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे-प्रकाश पवार

तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे-प्रकाश पवार 

ग्रामीण भागात अद्ययावत तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे-प्रकाश पवार 

भुईंज : तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ दिले आहे, असे प्रतिपादन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार यांनी पाचवड, ता. वाई येथे केले.परराष्ट्र सेवेतील अधिकारी कै.राजेश स्वामी यांनी आपल्या कर्तृत्वामुळे  सातारा जिल्ह्याचें नाव मोठे केले आहें.

वाई येथील राजू पवार यांनी या अभ्यासिकेला मौल्यवान ग्रंथ संपदा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. राजू पवार यांनी, ग्रामीण भागात देखील अशा प्रकारची सर्व सोयींनी परिपूर्ण अभ्यासिका असल्याने त्याचा लाभ युवकांना, विद्यार्थ्यांना होत असल्याचा आनंद व्यक्त केला.

अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका शिल्पा पवार यांनी, या अभ्यासिकेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता यावा याकरता विद्यार्थ्यांच्या मागणीवरून वेळ वाढवल्याचे सांगितले.

यावेळी प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, उत्कर्षचे वसुली अधिकारी आनंद पवार, सीमा सुरक्षा दलाचे जवान अक्षय पवार उपस्थित होते. तिरंगा संस्थेच्या वतीने राजू पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket