मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » राज्य » जातीपातीत भांडणे लावणाऱ्या आगपेट्यांपासून सावध रहा आ.जयकुमार गोरे

जातीपातीत भांडणे लावणाऱ्या आगपेट्यांपासून सावध रहा आ.जयकुमार गोरे

जातीपातीत भांडणे लावणाऱ्या आगपेट्यांपासून सावध रहा आ.जयकुमार गोरे ;

माण – खटाव मतदारसंघात भाजपामध्ये इनकमिंग फर्मात 

सातारा : प्रतिनिधी शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातून तसेच माण – खटाव मतदारसंघातील जनतेकडून भरभरून मते घेतली मात्र कोणतीच विकासकामे केली नाहीत. निवडणूका आल्या की ते काड्या घालायचे काम करतात. त्यांनी आजपर्यंत फक्त सोयीचेच राजकारण केले आहे. जातीवंत राजकारणाशी त्यांचा कधी संबंध आला नाही. माण – खटावमधील त्यांचे बगलबचेही जातीपातीत भांडणे लावायचे उद्योग करत आहेत. अशा आगपेट्यांपासून जनतेने सावध रहवे असे आवाहन आ. जयकुमार यांनी केले. 

     निमसोड गटातील गावभेट दौऱ्यात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. 

    आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मी विधानसभेच्या माझ्या प्रत्येक निवडणूकीत नवीन उद्दिष्ट समोर ठेवून जनतेच्या समोर गेलो. वेळेचे बंधन घालून प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करत आलो. त्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. माण – खटावच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बारा वर्षांपूर्वी सुरुवातीला उरमोडीचे पाणी मतदारसंघात आणून दुष्काळमुक्तीच्या लढाईची सुरुवात केली. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहचवून मतदारसंघाची वाटचाल समृद्धीकडे सुरु केली. तारळीचे आणि जिहेकठापूरचे पाणी आल्याने बागायती शेतीचे स्वप्न पूर्णत्वाकडे निघाले आहे. जिहेकठापूरचे पाणी वंचित भागाला देणाऱ्या योजना कार्यान्वित होत आहेत. टेंभूचे अडिच टीएमसी पाणी मतदारसंघातील ५२ गावांची तहान भागवायला यायची कामे सुरु झाली आहेत. दुष्काळी भागाचे नंदनवन करण्यासाठीच्या पाणी योजना मार्गी लावण्याचे काम मी प्राधान्याने पुढे घेऊन गेलो आहे. पाणी आल्याने दुष्काळाचे मळभ दूर होवू लागले आहे. माझा शेतकरी बागायती शेती करु लागला आहे. येणाऱ्या तीन वर्षात माझी दुष्काळमुक्तीची लढाई संपलेली असेल. 

     आ. गोरे पुढे म्हणाले, पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी माण – खटावच्या पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नचे केले नाहीत. फलटण, बारामतीकरांनी तर या भागासाठी पाणीच उपलब्ध नाही तर देणार कुठले असा प्रश्न उपस्थित करुन जनतेला झुलवत ठेवले होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच माण – खटावमध्ये असंतोष पसरला होता. त्यांनी पाणी आणले नाही म्हणूनच मला ते शिवधनुष्य उचलावे लागले. 

     भाजपा महायुतीचे सरकार समाजातील सर्व घटकांच्या पाठिशी ठाम उभे राहिले आहे. महिला, माता, भगिनी,शेतकरी, युवक, युवतींसाठी विविध योजना राबविण्यात आमचे सरकार आघाडीवर राहिले. यापुढेही आमचे सरकार सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध रहाणार आहे. माण – खटाव मतदारसंघातील आमच्या विरोधातील गावोगावचे स्वयंघोषित पुढारी खरे तर वाजंत्री आहेत, मात्र ते नवरदेव व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून खोटी नेरेटीव्ह तयार कले जात आहेत. सूज्ञ जनतेने त्यांचे मनसुबे चांगलेच ओळखले आहेत. या निवडणूकीत त्यांच्याकसे विकासाचे व्हिजन नाही आणि केलेल्या कामांबाबत सांगण्यासारखे काही नाही. त्यांचे कुटील मनसुबे जनता कधीच यशस्वी होवू देणार नाही. 

माण – खटाव भाजपामध्ये इनकमिंग फर्मात …..

आ. जयकुमार गोरेंच्या गावभेट दौऱ्याला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीत भवितव्य नसल्याचे ध्यानात यायला लागल्याने अनेक नेते आणि पुढारी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. दोन्ही तालुक्यातून आ. जयकुमार गोरेंच्या गटात इनकमिंग चांगलेच फर्मात आले आहे. ज्यांनी मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळी कलंक पुसण्याचे आणि पुढच्या पिढ्यांचे भले केले आहे त्या आ. जयकुमार गोरेंचे हात बळकट करण्यासाठीच आम्ही भाजपाची विचारधारा स्विकारत असल्याचे गावोगावच्या प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket