नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कदापिही काम करणार नाही- माजी आमदार मदनदादा भोसले यांचे कार्यकर्ते आक्रमक

ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कदापिही काम करणार नाही- माजी आमदार मदनदादा भोसले यांचे कार्यकर्ते आक्रमक 

ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कदापिही काम करणार नाही- माजी आमदार मदनदादा भोसले यांचे कार्यकर्ते आक्रमक 

वाई प्रतिनिधी-ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कदापिही काम करणार नाही.महायुती पक्षादेश आम्ही काही मानत नसून दादा,तुमच्याशिवाय आम्हाला कुणीही वाली नाही.दादा,तुम्ही लढा, तुमच्या विजयासाठी आम्ही जीवाच रान करू,अशा तीव्र भावना व्यक्त करून कार्यकर्त्यांनी मदन दादा भोसले यांच्यावर लढण्यासाठी दबाव आणला.

    महायुतीची उमेदवारी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना जाहीर झाल्यावर उद्दिग्न होऊन कार्यकर्त्यांनी मदनदादांना साताऱ्यातील निवासस्थानी गाठले.मदन दादानी कार्यकर्त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.आम्ही वर्षानुवर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला,त्यांच्या विजयासाठी काम करणं आम्हाला कधीच पटणार नाही.महायुती,आघाडीचा धर्म त्यांनी कधी पाळला आहे का?ज्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खासदारकी,आमदारकी,इतर सत्ता मिळाली ते त्या नेत्यांचे होऊ शकले नाहीत,असे लोक महायुतीचा धर्म पाळल्यावर आपले कसे होतील? त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना न्याय देता येईना ते आपल्या कार्यकर्त्यांना काय न्याय देणार।असा खडा सवाल करून कार्यकर्त्यांनी दादा,महायुती वगैरे आम्हाला काही माहीत नाही,तुम्ही लढायच,त्या आमदारांना सगळी सत्ता त्यांच्या घरात पाहिजे त्यांना जमिनीवर आणायला आम्ही सक्षम।आहोत.दादा,तुम्हाला मैदानात उतरवावेच लागेल,आम्ही रक्ताचे पाणी करू पण।तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.तुम्ही तुतारीतून लढा अथवा अपक्ष लढा,तुम्ही म्हणाल ते धोरण अन तुम्ही बांधाल तेच आमचे तोरण.!आमचे तुमच्यावर प्रेम आहे,निष्ठा आहे, तुम्ही कसे लढत नाही हेच आम्ही बघतो,असा निर्वाणीचा इशाराही कार्यकर्त्यांनी दादांना दिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket