Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालक, चालक आणि आयोजकांवर कारवाई करावी असे जाहीर निवेदन वाई पोलीस स्टेशन येथे देण्यात आले

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालक, चालक आणि आयोजकांवर कारवाई करावी असे जाहीर निवेदन वाई पोलीस स्टेशन येथे देण्यात आले

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालक, चालक आणि आयोजकांवर कारवाई करावी असे जाहीर निवेदन वाई पोलीस स्टेशन येथे देण्यात आले

वाई :डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत आहे आणि यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे डॉल्बी वापरणाऱ्या सर्व मालकांना आणि आयोजकांना याबाबत सतर्क राहून नियमांचे पालन करावे लागेल, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्या आयोजकांनी आणि मालकांनी स्थानिक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यांची नियमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि कोणतेही उल्लंघन टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सक्तीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दिनांक १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाई शहरात डॉल्बीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये जवळपास चार ते पाच डॉल्बी मध्ये आवाजाची चुरस लागल्याने वाई शहर दणाणून गेले होते. यामध्ये जवळपास चार ते पाच डॉल्बी मध्ये आवाजाची चुरस लागल्याने वाई शहर दणाणून गेले होते. यामुळे वाई शहरातील वयोवृद्ध व लहान बालके तसेच आजारी रुग्णांचा काळजाचा थरकाप उडाला होता. वाई शहराच्या प्रत्येक आळीत रुग्णालये आहेत याचे भान डॉल्बी मालक , चालक व आयोजकांना राहिले नाही. यामुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडल्याने वाईतील समस्त नागरिक त्रस्त झालेले होते व त्यामुळे याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. आणि याचसाठी पुढाकार घेऊन उत्कर्ष पतसंस्थेने मा न्यायालयाने नेमून दिलेल्या कायदेशीर नियमावली प्रमाणे डेसिबल नुसार डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ठेवली नाही तर उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी असे निवेदन उत्कर्ष पतसंस्थेच्या पुढाकाराने वाई पोलीस स्टेशन वाई यांना देण्यात आले. या निवेदनास सर्वांगी प्रतिष्ठान, वाई व्यापारी संघ, सराफ असोशिएशन, सोनार समाज, अखिल भारतीय पंचायत, ज्येष्ठ नागरिक संघ, टिळक स्मारक संस्था व अनेक वाईकर नागरिक यांनी पाठींबा दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

Post Views: 84 महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची

Live Cricket