मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » देश » धन्वंतरी पतसंस्थेतर्फे 8.75% व्याजदराने वाहन कर्ज वितरण

धन्वंतरी पतसंस्थेतर्फे 8.75% व्याजदराने वाहन कर्ज वितरण

धन्वंतरी पतसंस्थेतर्फे 8.75% व्याजदराने वाहन कर्ज वितरण

सातारा :- मा. राज्यपाल यांचे हस्ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने नवीन वाहन तारण कर्ज योजनेत सातारा शाखेचे ग्राहक श्री. अनिकेत पवार यांना नवीन Hyundai I२० या चारचाकी वाहनाचे खरेदीसाठी त्यांना अर्थसहाय्य देऊन सदर वाहनाचे वितरण करण्यात आले. संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या हस्ते सदर वाहनाची चावी श्री. अनिकेत पवार यांना प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी वरील कर्ज योजने विषयी माहिती देताना सांगितले की, संस्थेमार्फत घर बांधणी, फ्लॅट खरेदी, बंगला खरेदी तसेच नवीन वाहन खरेदी, सोनेतारण इ. साठी 8.75% व्याजदराने कर्ज तसेच गाळा, प्लॉट खरेदी व व्यावसायिक कारणांसाठी 11% व्याजदारने कर्ज दिले जाते, तसेच कर्ज प्रकारानुसार परतफेड मुदत 10 ते 15 वर्षे आहे.

राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व इतर पतसंस्थांच्या तुलनेत धन्वंतरी पतसंस्थेचा व्याजदर सर्वात कमी असून द.सा.द. शे. 8.75% व्याजदरामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होत आहेत. कर्जासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी, सर्व्हिसचार्ज आकारला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मा. व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे यांनी सदर योजनेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घेवून संस्था वाढीस हातभार लावावा असे आवाहन करून लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा असे सांगितले.

याप्रसंगी संचालक मा.डॉ. अरविंद काळे, डॉ. कांत फडतरे, डॉ. शकिल आत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सारिका मस्कर, डॉ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, डॉ. सुनिल कोडगुले, श्री. सूर्यकांत देशमुख उपस्थित होते.

संस्थेचे सभासद श्री. अनिकेत पवार यांना संस्थेच्या सातारा शाखेमधून वरील कर्ज योजनेतून कागदपत्राची पूर्तता करताच त्वरित कर्ज देण्यात आले. याप्रसंगी श्री. अनिकेत पवार यांचे नवीन वाहन खरेदीचे स्वप्न त्वरित पूर्ण झालेबद्दल व संस्थेने

दिलेल्या विनम्र व तत्पर सेवेबद्दल धन्वंतरी पतसंस्थेच्या सर्व मा. संचालक, पदाधिकारी व सेवक वर्गाचे त्यांनी आभार मानले.

वरील सर्व उपस्थितांचे स्वागत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे यांनी केले कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सातारा शाखेचे व्यवस्थापक सौ. रूपाली शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket