मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ दुचाकी वाहनांसाठी एम एच ११ इ डी नवीन मालिका सुरु जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्र उभारावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती
Home » राज्य » प्रशासकीय » शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी

शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी

शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी

‘महाजीपीटी’च्या माध्यमातून शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मानवी बुद्धिमत्तेला पर्याय म्हणून नव्हे, तर तिची क्षमता वाढविणारे साधन म्हणून वापरली पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अनुभवाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग एआय तंत्रज्ञानासोबत केल्यास निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी, अचूक आणि गतिमान होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे पार्टनर जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक, आयलॉग मिडियाचे रमणकुमार मिश्रा तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाजीपीटी’मुळे शासकीय निर्णय प्रक्रियेला गती

महाराष्ट्रात प्रत्यक्ष सुरू असलेल्या एआय आधारित उपक्रमाची माहिती देताना परदेशी यांनी ‘महाजीपीटी’ (MahaGPT) या प्रणालीचे महत्त्व सांगितले. मित्रा संस्थेने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने आणि आयआयटी रुरकीच्या पाठबळाने ही प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रणालीमध्ये गेल्या सुमारे ६० वर्षांतील दीड लाखांहून अधिक शासन निर्णय तसेच २ हजार २३० हून अधिक कायदे आणि त्यासंबंधित नियमांचा माहिती संग्रह उपलब्ध करण्यात आला आहे.

शासकीय अधिकाऱ्यांना निर्णय घेताना विविध शासन निर्णय, कायदे, नियम आणि संदर्भ तपासावे लागतात. ही माहिती एकत्रितपणे उपलब्ध झाल्यास निर्णय प्रक्रियेत लागणारा वेळ कमी होऊन संबंधित नियमांचा अचूक संदर्भ मिळण्यास मदत होईल. महसूल आणि नगरविकास विभागांमध्ये या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या विभागांसाठी सुमारे २८ हजार टिपण्या, २६ हजार शासन निर्णय आणि २ हजार ४४० कायदे व संबंधित नियमांचा समावेश असलेली माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भारतजेनच्या सहकार्याने विकसित लघु भाषा प्रारूपाचा (एसएलएम) यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील प्रश्नांना नियमांच्या आधारे उत्तरे

‘महाजीपीटी’ प्रणालीमध्ये मराठी भाषेत प्रश्न विचारून शासकीय नियमांनुसार उत्तरे मिळविण्याची सुविधा विकसित करण्यात येत आहे. दस्तनोंदणी कोणत्याही ठिकाणी करता येण्यासंदर्भातील शासन निर्णय, वर्ग-२ जमिनीवर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, जमिनीच्या वापरात बदल करण्याची प्रक्रिया, जिल्हाधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या जमिनींच्या भाडेपट्ट्याच्या नियमांची तुलना अशा प्रश्नांची उत्तरे ही प्रणाली देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ वैद्यकीय उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास

Live Cricket