मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ दुचाकी वाहनांसाठी एम एच ११ इ डी नवीन मालिका सुरु जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्र उभारावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती

शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती

शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती

सातारा -अध्यापनाचे पवित्र कार्य बाजूला ठेवून शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अनावश्यक ऑनलाइन व अशैक्षणिक कामांच्या विरोधात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे.आम्ही शिक्षक आहोत, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही.

शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या या मागणी करतात महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांची बैठक नुकतीच संपन्न झाली.यामध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून सर्वांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किरण यादव यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपल्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधव व भगिनींनी या बहिष्कार आंदोलनात उत्स्फूर्तपणे व एकजुटीने सहभागी व्हावे!

माहितीचा वार शनिवार असताना दररोज दिवसभर,रात्री उशिरा सुद्धा प्रशासकीय ग्रुप वर मेसेज टाकून माहिती मागवली जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिक स्थितीमध्ये बिघाड होत चालला आहे. अनेक शिक्षक अनेक आजारांनी त्रस्त झाले आहेत. काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन भेटलेल्या या निर्णयाला आपण सर्व प्रशासकीय ग्रुप मधून बाहेर पडून सहकार्य करावे असे आवाहन सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ वैद्यकीय उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास

Live Cricket