भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानवर १ विकेटने मात, टीम इंडिया आशिया चॅम्पियन
ओमान : मोहित उल्वा याने शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना चौकार ठोकत भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला आहे. भारताने यासह पाकिस्तानवर १ विकेटने मात करत अंडर १९ आशिया कप २०२६ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. उस्मान खान याने केलेल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने भारतीय संघासमोर आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३३८ धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. भारताने या विजयासह पाकिस्तानचा हिशोब चुकता केला. पाकिस्तानने भारताला गेल्या वर्षी याच स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं.
तसंच भारताला गेल्या रविवारी साखळी फेरीत पाकिस्ताने पराभूत केलं होतं. मात्र भारताने आता पाकिस्तानवर १ विकेटने मात करत या दोन्ही पराभवांची अचूक परतफेड केली आहे.



