सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » शेत शिवार » सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या अत्यंत संवेदनशील वनक्षेत्रात प्रस्तावित खासगी प्रकल्पांसाठी सुरू असलेली व संभाव्य बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी आक्रमक भूमिका ‘टायगर ग्रुप भारत’ संघटनेने घेतली आहे. या प्रकल्पांच्या वन व पर्यावरणविषयक परवानग्यांची सखोल कायदेशीर पडताळणी करावी आणि सुरू असलेल्या सर्व कामांना तात्काळ स्थगिती द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या संदर्भात टायगर ग्रुपचे संस्थापक मा. पै. जालिंदरभाऊ जाधव व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.मोहिते साहेब यांना सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे प्रशासनाला वस्तुस्थितीची जाणीव करून देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.

     शेकरूच्या अधिवासावर घाला

कर्जत परिसरातील साई डोंगर भागात पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो हेक्टर वनजमीन वळविण्याचा घाट घातला जात असून हजारो वृक्षांची कत्तल होण्याची भीती निर्माण झाली आहेदुसरीकडे युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेल्या पश्चिम घाटातील भीमाशंकर परिसरही खासगी प्रकल्पांच्या विळख्यात सापडत आहे भीमाशंकर हे केवळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र नसून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचे नैसर्गिक अधिवास केंद्र व अभयारण्य आहे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची पर्यावरणीय सुरक्षा धोक्यात येईल, असा गंभीर आक्षेप संघटनेने नोंदवला आहे

निवेदनातील प्रमुख पर्यावरणीय धोके व आक्षेप

    सह्याद्रीच्या तीव्र डोंगरउतारांवर अवजड यंत्रसामग्री सुरुंगांचे स्फोट आणि मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू झाल्यास पावसाळ्यात महाड, तळीये किंवा इर्शाळवाडीसारख्या भयंकर भूस्खलनाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.

          ही जंगले मुंबई, ठाणे, पुणे आणि थेट मराठवाड्यापर्यंत वाहणाऱ्या नद्यांची मुख्य पाणलोट क्षेत्रे आहेत आधीच दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईचे संकट गंभीर असताना जंगलांचा ऱ्हास झाल्यास पर्जन्यचक्र विस्कळीत होऊन भूजल पातळी कमालीची खालावेल.

       भीमाशंकर ते कर्जत हा सलग वनपट्टा बिबटे, शेकरू, सांबर, भेकर व दुर्मीळ वन्यजीवांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग (कॉरिडोअर) आहे. जंगलांचे तुकडीकरण झाल्याने वन्यजीव मानवी वस्तीत शिरून संघर्ष पेटेल.

       शेकडो वर्षांची जुनी परिसंस्था आणि नैसर्गिक जैवविविधता नष्ट करून इतरत्र निव्वळ कागदावर रोपे लावणे मूळ वनांची जागा घेऊ शकत नाही. भरपाई वनीकरणाची जमीन कुठे आहे व रोपे जगण्याचा दर काय, याची कोणतीही ठोस माहिती सार्वजनिक केलेली नाही.

       स्थानिक आदिवासी बांधव, शेतकरी आणि ग्रामसभांचे पुनर्वसन, संमती व कायदेशीर सार्वजनिक सुनावणीची प्रक्रिया पारदर्शकपणे न राबवता थेट कामे सुरू करणे बेकायदेशीर व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग करणारे आहे.

         सर्व वैधानिक पर्यावरण परवानग्या आणि मूल्यमापन पूर्ण होईपर्यंत कर्जत (साई डोंगर) व भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड व उत्खननाला तात्काळ ‘जैसे थे’ आदेश द्यावेत.

       वनजमीन हस्तांतरणाचे आदेश, परवानग्या, हायड्रॉलॉजिकल अहवाल आणि तोडल्या जाणाऱ्या झाडांची शास्त्रीय यादी अधिकृत संकेतस्थळावर व संबंधित ग्रामपंचायतींमध्ये खुली करावी.

        प्रकल्पाचे डिझाइन बदलून किंवा भूगर्भातील पर्यायांचा विचार करून जास्तीत जास्त झाडे कशी वाचवता येतील, याचा तज्ज्ञ समितीमार्फत ‘पर्याय अभ्यास’ सादर करावा.

        वन विभाग, महसूल विभाग, भूगर्भतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त समिती नेमून निष्पक्ष पाहणी अहवाल जाहीर करावा.

प्रशासनाला कडक इशारा 

प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल घेऊन सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील बेसुमार वृक्षतोड थांबवावी व केलेल्या कारवाईचा लेखी खुलासा द्यावा. निसर्गाचे अपरिमित नुकसान सुरूच राहिल्यास स्थानिक जनतेच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ‘टायगर ग्रुप’ रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल याची सर्वस्वी जबाबदारी शासन व संबंधित प्रकल्प चालकांवर राहील.”

 — कु.सलमान भाई पटेल (तालुका अध्यक्ष) व कु. कुणाल भाऊ राऊत (तालुका उपाध्यक्ष), टायगर ग्रुप भारत, महाबळेश्वर

महाबळेश्वर तालुक्यातून उत्स्फूर्त पाठिंबा महाबळेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयात निवेदन सादर करताना स्थानिकांचा मोठा पाठिंबा दिसून आला याप्रसंगी टायगर ग्रुप महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष कुणाल भाऊ राऊत यांच्यासह किशोर भाऊ शिंगरे, सुदेश घाडगे, आशुतोष वेलंगे, ऋषी शिंगरे, राकेश शिंगरे, गौरव, सागर साठे, आतिफ सय्यद, मयुर दवे, साहिल चोरगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket