धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
सातारा प्रतिनिधी -सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत व सक्षम असलेल्या धन्वंतरी नागरी सह. पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यकम अतिशय आनंदी व उत्साहाच्या वातावरणात मुख्य कार्यालयात पार पडला.
धन्वंतरी देवतेचे पूजन निमा वैदयकीय संघटनेचे संस्थापक डॉ. माणिक जाधव तसेच प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. संदिप निकम यांचे हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, आपर्णा सर्वाच्या सहकार्याने धन्वंतरी पतसंस्था राज्यात प्रथम कमांकाची सक्षम पतसंस्था झाली आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
आजमितीस संस्थेकडे २०८ कोटीचेवर ठेवी असून १६२ कोटी रुपयाचे कर्जवितरण केले असून संस्थेचा एकूण व्यवसाय ३७० कोटी रुपये झाला आहे. तसेच ११२ कोटी रुपये इतक्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक विविध सक्षम बँकामध्ये संस्थेने केली आहे. संस्था सुरुवातीपासूनच कर्जवसुली बाबत दक्ष राहील्यामुळे पतसंस्थेच्या कर्जदारांनाही नियमित हप्ते भरण्याची सवय लागली आहे. संस्थेचे सर्व संचालक विश्वस्ताच्या भावनेने पारदर्शक व्यवहार करत आहेत व सेवकही सभासदांना विनम्र सेवा देवून संस्थेच्या वाढीसाठीच सतत काम करीत आहेत. यामुळे स्थापनेपासून संस्थेला सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळत आहे यापुढेही त्यांनी असेच काम करुन संस्थेचा नावलौकीक हा महाराष्टातच नाही तर पूर्ण देशात वाढवावा असे त्यांनी यावेळी सांगीतले व पतसंस्था वाढीस मोलाचे सहकार्य करणा-या संचालक सभासद ठेवीदार व सेवक वर्गाचे आभार मानले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. माणिक जाधव यांचा सत्कार संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांचे हस्ते व डॉ. संदिप निकम यांचा सत्कार व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे सन्माननीय सभासद व बिचुकले गावचे सरपंच श्री. प्रशांत पवार यांचे उल्लेखनिय सामाजीक कार्याची दखल घेवून दै. प्रभातने आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविलेबददल त्यांचा सत्कार डॉ. संदिप निकम यांचे हस्ते करण्यात आला तसेच संचालक डॉ. जयदिप चव्हाण यांना नागठाणे येथील प्रकृती डायग्नोस्टीक सेंटर या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेबददल डॉ. माणिक जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले व निमा वैदयकीय संघटनेच्या नवनिर्वाचित संचालकाचा सन्मान संस्थेच्या मा. संचालकांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी निमा संस्थेचे सचिव डॉ. संजय यादव यांनी सत्काराबददल कृतज्ञता व्यक्त करून संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी डॉ. संदिप निकम म्हणाले की, संस्थेने केलेली प्रगती हि कौतुकास्पद असून तिच्या भक्कम आर्थिक स्थीतीमुळेच ठेवीदारांचा विश्वास व प्रेम संस्थेला मिळत आहे. संस्था सामाजिक बांधीलकीचे जाणीवेतून विविध कार्यक्रम राबवित आहे असेच सामाजिक कार्य तिने भविष्यातही चालू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन दोघांनीही सत्काराबददल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेचे संचालक मंडळ व सेवक वर्गाकडून नेहमीच त्वरीत सेवा मिळते याबददल समाधान व्यक्त केले तसेच डॉ. माणिक जाधव म्हणाले की, मी संस्थेचे कामकाज जवळून अनुभवले असून पारदर्शक व्यवहार, कार्यक्षम कर्जवसुली, व्यावसायिक व्यवस्थापन या त्रिसुत्रीच्या आधारे सर्वांना समान न्याय दिल्यामुळे संस्था सक्षम होवून सहकार क्षेत्रात सक्षमपणाचा मापदंड ठरली आहे व त्यामुळेच संस्थेला राज्यातील सर्वोच्च सहकार भुषण हा पुरस्कार मिळाला आहे.
संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे याप्रसंगी बोलताना म्हणाले, पतसंस्था ही सहकारक्षेत्रात काम करीत असली तरी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून तिचा शासनाच्या पल्स पोलिओ, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, कुष्ठरोग निवारण इ. कार्यक्रमात सतत सहभाग असतो. संस्थेने सभासदांचेकरीता मोफत वाचनालय सुरु केले असून सदर वाचनालयात विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच संस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम २ वर्षामध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व भविष्यात सर्वांच्या सहकायनि आपली संस्था शासनाचा सहकार महर्षी हा सर्वोच्च पुरस्कार निश्चित मिळवेल अशी खात्री दिली.
व कार्यकमाप्रेसगी सर्वांनी उपस्थिती दर्शवून कार्यकमाची शोभा वाढविलेबददल सर्व उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी संस्थेचे सभासद व ठेवीदार यांनी संस्थेच्या कामकाजाबददल व मिळत असलेल्या ग्राहकसेवेबददल समाधान व्यक्त केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी पाहुण्यांचा परीचय व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.श्रीहरी डिंगणे व सह. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.अलका मुरूमकर यांनी परीश्रम घोतले.
सदर प्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, डॉ. सुनिल कोडगुले, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.



