पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

नागपूर दि २४ : भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी व काळाचीही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय समारंभात बोलत होते. मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) येथे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे, सनफ्लॉवर व तायची पब्लिशिंगचे व्यवस्थापकीय संचालक राजेश घई, नवनीत प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष (एज्युकेशनल बुक्स डिव्हिजन) देविश गाला, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे, न्यू सरस्वती हाऊसचे नॅशनल सेल्स हेडचे प्रमुख विरल उपाध्याय, एड्युव्हेटचे प्रमुख नुपूर मराठे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे सहयोगी संचालक रविशंकर रथ आदी यावेळी उपस्थित होते.

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीची महानता सांगताना श्री. फडणवीस यांनी आचार्य चाणक्य, पाणिनी या विद्वानांचे व त्यांच्या ग्रंथाचे दाखले दिले. ते म्हणाले, पूर्वी शिक्षणाची प्रणाली ‘शास्त्र’ व ‘संवाद’ रुपात होती. ज्ञान केवळ सैद्धांतिक नव्हते तर उपयोजित व कौशल्य-आधारित होते. त्यातूनच राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक विकास साधता येतो. ‘एआय’च्या युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याची मोठी जबाबदारी नव्या पिढीवर असून आपल्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांभोवतीच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. या परिषदेने ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना मांडली असून ‘झेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’पेक्षा ती निराळी आहे. ही पहिली पिढी आहे, जी माहितीच्या स्फोटासोबत जन्माला आली व तंत्रज्ञानाच्या स्फोटासोबत वाढत आहे. ‘मिलेनियल्स’ अशी पिढी आहे की ज्यांच्या आयुष्याचा नंतरचा भाग विकसित तंत्रज्ञानासोबत जात आहे. ‘जनरेशन वॉव’कडे प्रचंड प्रमाणात माहिती व अफाट उगमस्थाने आहे. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची व त्याचा विचारपूर्वक वापर करण्याची दुहेरी जबाबदारी या पिढीवर आहे. ज्ञान हे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे शहाणपण आहे. त्या माहितीला एक नैतिक स्वरूप देणे, योग्य-अयोग्य ओळखणे व संवेदनशीलतेने ते आचरणात आणणे हेच आज खरे आव्हान आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २४: राज्यात घरगुती पाइप गॅस

Live Cricket