मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

सातारा दि. २३ – सातारा शहरात नागरिकांना निकृष्ट व भेसळयुक्त अन्न पदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा सार्वजनिक आरोग्याचा विषय असल्याने मनसे शहर अध्यक्ष श्री. राहुल पवार यांनी दि. ०१/१०/२०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनास निवेदन दिले होते.

निवेदनात स्पष्टपणे नमूद केले होते की, कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा आस्थापनेविरुद्ध पूर्वग्रहदूषित आरोप करण्याचा हेतू नाही, तर तक्रारीची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कायदेशीर पद्धतीने पडताळणी करून तथ्य समोर आणावे. तसेच ७ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

या निवेदनाची तातडीने दखल घेत सहाय्यक आयुक्त (अन्न), सातारा यांनी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती चव्हाण व श्रीमती खापणे यांच्या पथकामार्फत विशेष मोहीम राबवली.

प्रशासनाने कळवलेल्या कारवाईचा अहवाल (पत्र दि. १९/१०/२०२६) नुसार :

– राजमाने तेल डेपो : १,६३,००० रुपयांचा माल जप्त, परवाना तात्काळ निलंबित*

– सिव्हील हॉस्पिटल मधील साईबाबा कॅन्टीन : परवाना तात्काळ निलंबित*

– हेगडे मिल्क, शुक्रवार पेठ : त्रुटी आढळल्याने परवाना १२ दिवस निलंबित

– लाटकर कंदी पेढा, पोवई नाका : २४,१२० रुपयांचा खवा जप्त

– डी.के. तेल डेपो : २०,००० रुपये दंड

याशिवाय डोमिनोज, KFC, McDonald’s, Hotel De Farm, काका पेढेवाले, लाटकर बंधू पेढेवाले, हॉटेल आमंत्रण, राजपुरोहित मिठाई, मोरे फुड कॉर्नर, गुरुदत्ता मेस येथून खवा, हळद, तेल, मोदक पेढा, मेथी पापडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून पुढील दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसेने घेतलेल्या या भूमिकेला यश आल्याबद्दल समाधान व्यक्त करत, ही कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. नागरिकांना योग्य अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहर नेहमीच अलर्ट भूमिकेमध्ये असून येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त भेसळखोर करणारे आढळल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket