Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » समर्थ खामकर व समशेर शिंदे दिव्यांशु डुबल व शौर्य पवार यांना सुवर्णपदक ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

समर्थ खामकर व समशेर शिंदे दिव्यांशु डुबल व शौर्य पवार यांना सुवर्णपदक ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

समर्थ खामकर व समशेर शिंदे दिव्यांशु डुबल व शौर्य पवार यांना सुवर्णपदक ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

 सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील बॉक्सर समर्थ खामकर , समशेर शिंदे या विद्यार्थ्यांनी 17 वर्षे वयोगटामध्ये तर दिव्यांशु डुबल याने 14 वर्षे वयोगटांमध्ये तसेच न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शौर्य पवार यानेही 14 वर्षे वयोगटांमध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण झेप घेतली.

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दणदणीत विजय संपादन केल्यामुळे शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे.त्यांच्या या यशामध्ये प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कष्ट व पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे.राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी अशीच दमदार कामगिरी करावी यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेतील सर्वच पदाधिकारी, संचालक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या

Live Cricket