Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सातारा- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील तब्बल ४९ गावे आणि २६५ वाड्या सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या बाधित भागातील ६२ हजार ८९२ लोकसंख्या आणि ४४ हजार ३४१ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

माण तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्यांमधील ५१ हजार ७९६ नागरिक व ४१ हजार १४१ पशुधन टंचाईने प्रभावित झाले आहेत. येथे टंचाईवर मात करण्यासाठी १ शासकीय आणि ३२ खाजगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे. 

खटाव तालुक्यातील ९ गावे आणि ३९ वाड्यांमधील ९ हजार ७२४ नागरिक व ३ हजार १५५ पशुधनाला ५ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ३७२ लोकसंख्या व ४५ पशुधनाला १ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच एकूण १० विहिरी व १० बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या

Live Cricket