‘सहकारभूषण’ धन्वंतरी पतसंस्थेतर्फे धन्वंतरी पुरस्कार जाहीर
सातारा : सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात आदर्श असणाऱ्या सहकारभूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक इ. विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आपल्या सभासदांना प्रतिवर्षी पुरस्कार वितरित करीत असते. धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने तिच्या ३७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सभासदांना शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता धन्वंतरी भवन, शनिवार पेठ, सातारा येथील धन्वंतरी सभागृहात पुरस्कार वितरण सभारंभ आयोजित केला आहे.
धन्वंतरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने गत चार वर्षाकरिताचे पुरस्कार संस्थेने जाहीर केल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांनी सांगितले. यामध्ये सन २०२२-२३ करिता डॉ. विलास हिराचंद शहा, डॉ. विजयकुमार शंकरराव सुखटणकर, डॉ. सुभाष बळवंत हिरवे यांना तर २०२३-२४ करिता डॉ. सुधाकर एकनाथ लावंड, डॉ. महादेव शंकर मोरे, डॉ. सुधाकर शंकरराव बेंद्रे यांना, तसेच २०२४-२५ करिता डॉ. दिलीप महादेव पटवर्धन, डॉ. श्रीरंग आबाजी कुंभार, डॉ. सुधीर परशुराम पवार, २०२५-२६ करिता स्व. डॉ. क. श्री. लाहोटी, स्व. अरुण रामकृष्ण गोडबोले,डॉ. सौ. प्रिया महेश शिंदे यांचा समावेश असून या सभासदांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
रोख रक्कम, मानपत्र, मोमेंटो, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर कार्यक्रमास सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळातर्फे चेअरमन डॉ. रवींद्र भोसले व व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांनी केले आहे.



