अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा
Home » राज्य » शेत शिवार » सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खाजगी टँकरचा समावेश तसेच पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे. 

माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच १० विहिरी आणि ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. 

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७,८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये ६ विहिरी आणि ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे. 

फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱ्या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मोशी दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी

Live Cricket