सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शेत शिवार » सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खाजगी टँकरचा समावेश तसेच पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे. 

माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच १० विहिरी आणि ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. 

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७,८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये ६ विहिरी आणि ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे. 

फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱ्या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket