साताऱ्याचे प्रितेश सपकाळ यांचा आय टी क्षेत्रातील झेंडा साता समुद्रापलीकडे
कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती.
सातारा -जागतिक पातळीवरील अग्रगण्य एफ एम जी सी (FMCG) कंपनी कोलगेट – पामोलिव्ह मध्ये कार्यरत असलेले प्रितेश सपकाळ यांना कंपनीत मोठी बढती मिळाली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभव आणि कार्यपद्धतीनुसार, त्यांची कंपनीच्या सीनियर डायरेक्टर या उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदोन्नतीसह त्यांच्याकडे आता कंपनीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ग्लोबल आयटी ऑडिट व आयटी अँनालिस्ट या दोन जागतिक विभागाची प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रितेश गेल्या अनेक वर्षापासून कार्पोरेट क्षेत्रात विशेषता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट आणि डेटा अँनालिटिक्स क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आहेत त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची आणि अनुभवाची दखल घेत कंपनीने त्यांच्यावर ही मोठी जागतिक जबाबदारी सोपवली आहे
या नव्या भूमिकेत प्रितेश हे जगभरातील कोलगेट पामोलिव्ह समूहाच्या आयटी ऑडिट प्रक्रिया अधिक सक्षम करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा (अँनालिटिक्स) वापर करून ऑडिट व्यवस्था मजबूत करण्याचे काम पाहणार आहेत. एका भारतीय व्यक्तीची जागतिक स्तरावरील अशा महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रितेश सपकाळ हे शाहूनगर साताऱ्याचे रहिवाशी असून ते निवृत्त सहाय्यक राज्यकर आयुक्त व सातारा हॉस्पिटल सातारा परिवाराचे हितचिंतक सदस्य श्री तानाजी सपकाळ यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या या यशाबद्दल सातारा हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुरेश शिंदे सर, डॉक्टर जयश्री शिंदे ,सीईओ विक्रम शिंदे, डॉक्टर विकास जाधव, डॉक्टर निलेश साबळे व सर्व हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ कर्मचारी, नर्सिंग व शिंदे परिवार यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात येत आहेत. याशिवाय हितचिंतक सुप्रसिद्ध डॉ जगदीश हिरेमठ सर , डॉ मधुसूदन आसावा , श्री जयेंद्र चव्हाण ,श्री शैलेंद्र पळनीटकर यांचे कडून हि शुभेच्छा दिल्या आहेत .




