महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी गायिकांनी गायनासोबत लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती. 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बर यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी इंडोनेशियातील उच्च शिक्षण, विद्यार्थी विनिमय, संशोधन व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधींचे दालन खुले

यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बर यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी इंडोनेशियातील उच्च शिक्षण, विद्यार्थी विनिमय, संशोधन व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधींचे दालन खुले

यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बर यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी इंडोनेशियातील उच्च शिक्षण, विद्यार्थी विनिमय, संशोधन व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधींचे दालन खुले

सातारा : यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा आणि इंडोनेशियातील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बर यांच्यात शैक्षणिक व संस्थात्मक सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना इंडोनेशियातील उच्च शिक्षण, विद्यार्थी विनिमय, संशोधन, इंटर्नशिप, कौशल्यविकास तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

बीबीए, बीसीए, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित ओरिएंटेशन अँड इंडक्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने या सामंजस्य कराराची घोषणा करण्यात आली. इंडोनेशियातील युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बरचे डॉ. रोमधी रोझी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाच्या संधींचे नवे दालन खुले झाले आहे.

या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही संस्थांमध्ये विद्यार्थी विनिमय, फॅकल्टी एक्स्चेंज, संयुक्त संशोधन, शैक्षणिक सहकार्य, इंटर्नशिप, कौशल्यविकास कार्यक्रम, संयुक्त शैक्षणिक उपक्रम आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना इंडोनेशियातील शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याबरोबरच विविध संस्कृती, शिक्षणपद्धती आणि आंतरराष्ट्रीय कार्यपरिसर समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

विशेषतः व्यवस्थापन आणि संगणक अनुप्रयोग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीबीए, बीसीए, एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षणाच्या संधी, संयुक्त प्रकल्प, संशोधनविषयक सहकार्य आणि इंडोनेशियातील संस्थांशी व्यावसायिक नेटवर्किंग करण्याची संधी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकतेमध्ये वाढ करण्यासाठी हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बरचे डॉ. रोमधी रोझी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि जागतिक करिअरच्या संधींचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर लक्ष केंद्रित न करता जागतिक पातळीवर आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करावीत, विविध संस्कृती समजून घ्याव्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी स्वतःला तयार करावे, असे त्यांनी सांगितले. युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बरसोबत झालेला सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी या दिशेने प्रत्यक्ष संधी निर्माण करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे होते. यशोदा टेक्निकल कॅम्पसने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय exposure यांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. याच व्यापक दृष्टिकोनातून युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बरसोबत करण्यात आलेला हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक परिसंस्थेशी जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ वर्गखोलीतील शिक्षणावर अवलंबून न ठेवता उद्योगसंवाद, प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप, व्यावसायिक प्रमाणपत्रे, कौशल्यविकास प्रशिक्षण, प्लेसमेंटपूर्व तयारी, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संवाद यांचा अनुभव देण्यावर भर दिला जात आहे. युनिव्हर्सिटी ऑफ जेम्बरसोबतचा सामंजस्य करार या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय परिमाण देणारा ठरणार आहे.

ओरिएंटेशन अँड इंडक्शन कार्यक्रमादरम्यान नव्या विद्यार्थ्यांना यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या स्वायत्त शैक्षणिक व्यवस्थेची, उपलब्ध शैक्षणिक व कौशल्यविकासाच्या संधींची तसेच उद्योगाभिमुख उपक्रमांची माहिती देण्यात आली. विविध प्रवेश परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या सामंजस्य करारामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्थानिक शिक्षणातून जागतिक संधींकडे’ जाण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला असून, भारत-इंडोनेशिया शैक्षणिक सहकार्याला सातारा येथून नवी दिशा मिळाली आहे.

कार्यक्रमाला विश्वस्त आर्किटेक्ट डॉ. स्वराली सगरे, एज्युब्रिजचे कार्यवाह, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे कुलसचिव, संचालक, सहसंचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, अधिष्ठाता, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा

Live Cricket