श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

“गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

वाई (संजीव वरे ): जात्यावरच्या ओव्या, पाळणे, उखाणे, अंगाई गीते ही गाणी लोकसाहित्याची अक्षरलेणी आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांनी या गाण्यांचे जतन आणि संवर्धन केले. त्या खऱ्या लोकसंस्कृतीच्या निष्ठावंत उपासक आहेत. ‘हरिबाईची गाणी’ हा गीत संग्रह लोकसंस्कृतीचा अमृत कुंभ आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. “गाणी हरिबाईची” या गीतसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, हरिबाई शिंदे, तानाजी शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे पुढे म्हणाले, कोविडच्या काळात सगळं जग एका जागेवर थांबले असताना, हरिबाईचे सुपुत्र तानाजीराव शिंदे यांनी आपल्या आईला गाते केले. आईच्या ओव्यांमध्ये त्यांना सांस्कृतिक ऐश्वर्य आणि आंतरिक सामर्थ्य जाणवले. आईने अनेक वर्षे काळजात जपून ठेवलेल्या ओव्यांचे त्यांनी शब्दांकन आणि संकलन करून काळजातली गाणी कागदावर उतरवली. जाते हे केवळ धान्य दळण्याचे साधन नाही, तर ते लोकसंस्कृतीचे जागृत विद्यापीठ आहे. जात्यावरच्या ओव्यांतून स्त्री मनाच्या व्यथावेदनांचं, सुखदुःखाचं, देव देवतांचं आणि लोकपरंपरांचं प्रत्ययकारी दर्शन घडते. सध्या आधुनिक काळात हा लोकसंस्कृतीचा ठेवा दुर्लभ होत चालला आहे.

तानाजीराव शिंदे यांनी आईच्या अनंत आठवणींना आणि ओव्यांना ग्रंथाचे कोंदण देऊन मातृभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. हा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील तरुणांनी परंपरेने चालत आलेला लोकसंस्कृतीचा वैभवशाली वारसा जपला पाहिजे.

यावेळी बोलताना महादेव मस्कर यांनी आईच्या मुखातून आलेल्या ओव्या, पाळणे आणि जात्यावरची गाणी हा अमूल्य ठेवा पुस्तकरूपात आणून तानाजीराव शिंदे यांनी वेगळा आदर्श घालून दिल्याचे सांगितले. यावेळी चंद्रकांत जाधव यांनीही आपल्या मनोगतात माय लेकराच्या या अनोख्या नातेसंबंधावर प्रकाश टाकला. श्रीमती जयश्री शिंदे यांनी आपल्या मनोगतात हरिबाई यांच्या मिश्किल स्वभावाबाबरोबरच नातेसंबंधातील विविध पैलूंना उजाळा दिला.

प्रास्ताविकात बोलताना तानाजीराव शिंदे म्हणाले, आई सोबत गप्पा मारत तिच्याकडून या ओव्या, पाळणे आणि गाणी ऐकून त्या पुस्तक रूपात प्रकाशित करण्याची संकल्पना सुचली. कोविडच्या काळात या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. याकामी पाटणे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रतिक कालेकर यांनी मुखपृष्ठ आणि पुस्तकाची अंतर्गत सजावट यासाठी बहुमोल योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आम्हा भावंडांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आईच्या गळ्यातून आलेला प्रत्येक स्वर प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गायक मच्छिंद्र नलावडे आणि तेजस्विनी पोरे यांनी पुस्तकातील पाळणा, ओव्या सुरेल स्वरात सादर केली. सूत्रसंचालन केशव कोदे आणि अशोक येवले यांनी केले. अजिंक्य शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket