वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड
वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील बार असोसिएशनच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. दिनेश पांडुरंग धुमाळ यांची, तर उपाध्यक्षपदी अॅड. संतोष जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये सचिवपदी अॅड. ज्योती माहूरकर, खजिनदारपदी अॅड. किशोर देवकर, पुरुष प्रतिनिधीपदी अॅड. अतुल देवकर, महिला प्रतिनिधीपदी अॅड. अमृता गाढवे, तर सदस्यपदी अॅड. उत्कर्ष कदम यांची निवड झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. दिनेश धुमाळ यांनी वकील बांधवांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच बार असोसिएशनची लायब्ररी अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल वकील बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.





