शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शेतातील गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

शेतातील गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

शेतातील गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सातारा:- शेती पिकांचे मोठे नुकसान करणाऱ्या गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. गोगलगायी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा सूर्योदयापूर्वी जास्त सक्रिय असतात. त्यामुळे या काळात शेतात आढळणाऱ्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात बुडवून नष्ट करावीत.

या किडीला एकत्र गोळा करण्यासाठी शेतापासून ७ ते ८ मीटर अंतरावर बांधावर गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषांचे ढीग लावावेत आणि त्यावर गुळाचे पाणी फवारावे. सकाळी या ढिगाखाली गोगलगाय व त्यांची अंडी आढळून येतात, ती मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकून नष्ट करावीत. पाऊस नसेल तर शेताच्या बांधापासून साधारण ५ सेंटीमीटर अंतरावर चुन्याच्या भुकटीचा थर धुरळल्यास बांधावरील गोगलगायी शेतात येण्यापूर्वीच चुन्याच्या संपर्कात येऊन नष्ट होतात.

तसेच निरुपयोगी गोणपाट २.५ टक्के गुळाच्या द्रावणात किंवा १५ टक्के मिठाच्या द्रावणात बुडवून प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति एकर १० गोणपाट याप्रमाणे अंथरून ठेवल्यास गोगलगायी त्याकडे आकर्षित होऊन त्यांचा सहजरित्या नाश करता येतो. भाजीपाला पिकांमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास मेटालडिहाईड २.५ टक्के प्रति एकर २ किलो याप्रमाणे धुरळणी करावी.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket