विक्रमगडमध्ये पांडुरंगजी पाटील यांचे शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत
विक्रमगड : पालघर जिल्ह्याचे लोकसभेचे संपर्कप्रमुख सन्माननीय श्री. पांडुरंगजी पाटील साहेब हे विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे विक्रमगड तालुकाप्रमुख श्री. संजयजी आगिवले साहेब यांच्या हस्ते पांडुरंगजी पाटील यांना शाल तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. सुरेश पाटील पष्टे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. योगेशजी भानुशाली, श्री. रुपेशजी डोले, श्री. लक्ष्मण पडवळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांडुरंगजी पाटील यांच्या स्वागतावेळी शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला. यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.




