शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी होणार साजरा

माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी होणार साजरा

माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी होणार साजरा

सातारा- आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माहितीच्या अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी आणि कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देवून व विविध उपक्रम राबवुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या दिवशी शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये,विद्यापीठे व इतर शैक्षणीक संस्थामध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, चित्रकला, निबंध, व वक्तृत्व, स्पर्धा,चर्चासत्रे, व्याख्यानमाला,इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हयातील शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , सहायक धर्मादाय आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीदार व सातारा जिल्हयातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांना महितीचा अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की माहिती अधिकार बाबत जनजागृती होण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket