गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

मुंबई- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले असून, संबंधित लाभार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार ओटीपीचा पर्याय

ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळणार

२१ सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून रु. १९९ शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरण१९ सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

क्यूआर कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट

16 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना क्युआर कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत एनसीएमसी कार्ड ॲक्टीव्ह करून त्यामध्ये टॉप-अप करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सर्व सवलतधारकांनी तातडीने एनसीएमसी नोंदणी करावी

एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तात्काळ एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव”

Live Cricket