शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » दिशा सालियन यांना ना कधी भेटलो, ना ओळखत होतो; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले

दिशा सालियन यांना ना कधी भेटलो, ना ओळखत होतो; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले

दिशा सालियन यांना ना कधी भेटलो, ना ओळखत होतो; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई -शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलेलो नाही आणि त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असे आज स्पष्ट केले. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाची राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे चौकशी होऊ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आज सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही आपले नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं पँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करून केल्या जाणाऱया टीव्ही चॅनल्सवरच्या खोटय़ा चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्या,’ असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अशा चारित्र्यहननाच्या आणि खोटय़ा प्रचाराच्या मार्गाने शिवसेनेला शांत बसवू शकतो असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरूच राहील.

या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही आपले नाव जोडण्याचा 6 वर्षांपासून हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. हे सततचं खोटं कँपेन दुर्दैवी आहे. टीव्ही चॅनल्सवरच्या खोटय़ा चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket