सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार)
सातारा -सातारा जिल्हयामधील शिरवळ पोलीस ठाणे परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोळीचा प्रमुख ओंकार दत्तात्रय क्षिरसागर वय २५ वर्षे, टोळी सदस्य) २) वेदांत जितेंद्र जाधव वय २० वर्षे, ३) शुभम राजेंद्र भोई वय २१ वर्षे, सर्व रा शिरवळ ता खंडाळा जि सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे, यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने शिरवळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री महेश इंगळे, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हद्दीतुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांनी केली होती.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे खंडाळा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतून त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
मा. निखील पिंगळे, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या टोळीची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हददीतुन ०१ वर्षे, कालावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाणेकडील अंमलदार यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.





