शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष

शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष

शिक्षणसेवेचा वसा जपत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारे नेतृत्व हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव, हिलरेंजचे प्राचार्य जतीन भिलारे यांचा वाढदिवस विशेष

पांचगणी -ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेऊन सातत्याने कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा हिलरेंज हायस्कूलचे प्राचार्य आदरणीय जतीन भिलारे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.

शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम ठरावे, या विचारातून जतीन भिलारे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या गुणवत्तेला विशेष प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, आधुनिक शैक्षणिक पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांना वाव देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

त्यांना लाभलेला हा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा अत्यंत प्रेरणादायी आहे. आदरणीय कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांनी निर्माण केलेला शैक्षणिक आणि सामाजिक सेवेचा वारसा अखंड तेवत ठेवण्याचे कार्य जतीन भिलारे समर्थपणे पुढे नेत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी अनेक उपक्रमांना चालना दिली आहे.

शांत, संयमी, अभ्यासू आणि जिज्ञासू शिक्षक म्हणून जतीन भिलारे यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम ते करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत आपले करिअर घडवत आहेत. या यशामागे जतीन भिलारे यांच्या दूरदृष्टीचे, सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे आणि शैक्षणिक कार्याचे मोठे योगदान आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, पुरस्कारांपेक्षा सक्षम, संस्कारक्षम आणि आत्मविश्वासू युवा पिढी घडविणे हेच आपल्या कार्याचे खरे समाधान आहे, या भावनेने ते आजही कार्यरत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळावी, यासाठी अविरत प्रयत्न करणारे जतीन भिलारे हे शिक्षण क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या कार्यातून बाळासाहेब भिलारे यांचा शैक्षणिक व सामाजिक विचार पुढे जात असून, ही ज्ञानज्योत अशीच प्रज्वलित राहो, हीच सदिच्छा.

आदरणीय जतीन भिलारे सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभो, तसेच त्यांच्या हातून असंख्य गुणवंत विद्यार्थी घडोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

पत्रकार, अली मुजावर 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket