गौरीशंकर मध्ये विद्यार्थ्यांनी केला गुरुजनांचा उचित सन्मान शिक्षक दिन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग
लिंब- गुरुजनांच्या निरपेक्ष भावनांचा नितांत आदर करीत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष बेल्हेकर,डॉ.भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे,डॉ. माधुरी मोहिते, डॉ. लिना पाठक, प्रा. रोहन खुटाळे,रजिस्ट्रार निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न ङाँ सर्वपल्ली राधाकुष्णन याच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर म्हणाले की शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अतूट ऋणानुबंधाचे नाते अधिक घट्ट करणारा दिन म्हणून संपूर्ण देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो. ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. विद्यार्थी प्रतिनिधी अनिश इथापे यांनी शिक्षकांबद्दल मत व्यक्त करताना म्हणाला की शिक्षक हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेऊन मार्गदर्शन करीत असतात त्यांच्यामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळत असते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा गौरी इथापे,प्रा. नितीन कांबळे,प्रा. प्राजक्ता कांबळे,प्रा. प्रियंका शिंदे,प्रा. मानसी गुजरे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रिद्धी लुबाळ हिने केले. आभार अनिश इथापे यांनी केले.




