Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » भावनांचा कल्लोळ म्हणजे सौ.कुसुम शिंदे यांचा पणती काव्यसंग्रह-प्रकाश सस्ते

भावनांचा कल्लोळ म्हणजे सौ.कुसुम शिंदे यांचा पणती काव्यसंग्रह-प्रकाश सस्ते 

भावनांचा कल्लोळ म्हणजे सौ.कुसुम शिंदे यांचा पणती काव्यसंग्रह-प्रकाश सस्ते 

पांचगणी-सौ कुसुम शिंदे यांनी लिहिला पणती हा काव्यसंग्रह भावनेच्या कल्लोळातून जन्मा आला आहे,त्यांची एकूण एक कवितेत ओतप्रोत भावना पाल्याला मिळते.कर्ता मुलगा ऐन तारुण्यात गेल्यामुळे मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्या कवितेकडे वळल्या आणि सहजगत्या अप्रतिम काव्य निर्मिती झाली.असे उद्गागार पणती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना धर्मवीर संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजक प्रकाश हस्ते यांनी काढले.

पाचगणी येथे झालेल्या कार्यक्रमात सौ.कुसुम जगन्नाथ शिंदे यांनी लिहलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले .या प्रसंगी माजी मुख्याध्यापक व प्राचार्य प्रकाश बेलोशे, पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक दोन चे मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे,मा मुरलीधर धायगुडे, जाधवराव,प्रा‌.सुनिल धनावडे,स्वाती जगदाळे,प्रतिभा बेलोशे, ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

सस्ते पुढे म्हणाले काव्य  विशिष्ट कारणाने जन्मा येते आणि ते सकस होते हे पणती  काव्यसंग्रहात दिसून येते.

सौ.कुसुम शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या नियतीने क्रुर डाव साधला आणि तिनेच शब्द दिले.सावरण्याचे बळ दिले, त्यातून हा काव्यसंग्रह संग्रह जन्माला आला.मान्यवरांचे स्वागत महादेव शिंदे यांनी केले प्रास्ताविक व आभार मुकुंद शिंदे यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कार्याचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Live Cricket