Home » राज्य » शिक्षण » विद्या निकेतन स्कूलच्या फुटबॉल संघाची दमदार कामगिरी; इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक

विद्या निकेतन स्कूलच्या फुटबॉल संघाची दमदार कामगिरी; इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक

विद्या निकेतन स्कूलच्या फुटबॉल संघाची दमदार कामगिरी; इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक

पाचगणी : महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पाचगणी येथील विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या फुटबॉल संघाने 7-A-Side Inter District Tournament 2026 मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत विद्या निकेतनच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे, जिद्दीचे आणि सांघिक खेळाचे दर्शन घडविले. प्रतिकूल परिस्थितीतही संघातील खेळाडूंनी एकजुटीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशामुळे विद्या निकेतन स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि खेळाडूवृत्तीला मिळालेले हे यश भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आगामी स्पर्धांमध्येही संघाने अशीच चमकदार कामगिरी करत यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन

पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन पाचगणी शहर विकास आघाडीची वचनपूर्ती; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी

Live Cricket