स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई
महाराष्ट्र विद्युत महावितरणाचे ट्रान्सफॉर्मर खांबावरुन खाली पाडून त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपींची टोळी जेरबंद करुन विद्युत तार चोरीचे एकूण 16 गुन्हे उघड करुन 4,75,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र विद्युत महातिरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर खांबावरुन खाली पाडुन त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी अज्ञात आरोपींची टोळी कार्यरत असून त्यांनी केलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असल्याने नमुद अज्ञात आरोपींची माहिती काढून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी दिल्या आहेत. त्याअनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे अधिपत्याखाली विशेष तपास पथक तयार केले व त्यांना विद्युत तार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचित केले.
दिनांक 20/08/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, 3 इसम महाराष्ट्र विद्युत महातिरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारांची चोरी करीत असून सदरचे इसम सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरन्ट चौकाचे परिसरामध्ये येणार आहे, तरी नमुद इसमांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे तपास पथकाने बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरामध्ये सापळा लावला. नमुद इसमांना परिसरामध्ये पोलीस असल्याचा संशय आल्याने ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी तपास पथकाने शिताफीने पकडून त्यांचेकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी पुसेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.69/2026 भान्यासंक 303(2), 324(4) सह भा.वि.अ.क.136 हा गुन्हा केल्याचे सांगीतल्याने नमुद तीनही इसमांना नमुद गुन्हयाचे कामी अटक करुन त्यांची 4 दिवस पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडी कालावधीत नमुद आरोपींच्याकडे तपास केला असता त्यांनी पुसेगाव, खंडाळा, शिरवळ, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 16 विद्युत तार चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतल्याने नमुद आरोपींच्याकडून विद्युत तार चोरीचे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणून 4,75,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी १) विशाल शरद पवार, वय ३५ वर्षे, रा.तरडगाव, ता.फलटण, जि.सातारा,
२) साहील उर्फ शक्तीमान उर्फ चुचन लेमन पवार, वय २२ वर्षे, रा.विटभट्टी जवळ निरा, ता.पुरंदर, जि.पुणे,
३) अदित लेमन पवार, वय २५ वर्षे, मुळ रा.निरा, सध्या रा.पवाराची निगडी ता.जि.सातारा
श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, अजय जाधव, अमित झेंडे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, इरफान मुलाणी, महेश निर्मळ, संकेत निकम,शकुंतला सणस, आदिका वीर यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.




