अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » माफक दर, उत्कृष्ट सेवा अन् ग्राहकांचा विश्वास; श्याम सेल्सची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल श्याम सेल्सच्या पाचव्या वर्धापन दिनाला मा.राजू भोसले यांची सदिच्छा भेट

माफक दर, उत्कृष्ट सेवा अन् ग्राहकांचा विश्वास; श्याम सेल्सची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल श्याम सेल्सच्या पाचव्या वर्धापन दिनाला मा.राजू भोसले यांची सदिच्छा भेट

श्याम सेल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईलचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

सातारा : सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल्ससाठी ग्राहकांचे हक्काचे दालन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्याम सेल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी, विसावा नाका, साताराचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सॅमसंग, हायर, व्हर्लपूल, एलजी यांसह विविध नामवंत कंपन्यांच्या होम अप्लायन्सेस आणि मोबाईल्सची उत्पादने ऑनलाइन बाजारपेठेपेक्षाही माफक दरात उपलब्ध करून देण्यासोबतच उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी श्याम सेल्सने सातारा शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्याम सेल्सचे डायरेक्टर प्रशांत घोरपडे आणि श्याम सेल्स परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, श्याम सेल्सच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी शॉपीला सदिच्छा भेट देऊन श्याम सेल्स परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी श्याम सेल्सच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने, माफक दर आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे काम श्याम सेल्सकडून सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

वर्धापन दिनानिमित्त सातारा शहरातील अनेक नामवंत उद्योजक, राजकीय पदाधिकारी तसेच ग्राहकांनी श्याम सेल्स शॉपीला भेट देऊन प्रशांत घोरपडे आणि श्याम सेल्स परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी श्याम सेल्सचे डायरेक्टर प्रशांत घोरपडे यांच्यासह श्याम सेल्स परिवार उपस्थित होता. ग्राहकांनी गेल्या पाच वर्षांत दिलेला विश्वास आणि मिळालेला प्रतिसाद हीच श्याम सेल्सच्या यशाची खरी ताकद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket