स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई गांजा विक्री करणाऱ्या आणखी दोन इसमांना भुईंज पोलिसांची अटक
सदर गुन्ह्यात एकूण १ लाख २१ हजार ३३० रुपये किमतीचा ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त
वाई -भुईंज पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २८२/२०२६, अमली पदार्थ अधिनियम कलम ८(क), २०(ब) वगैरे अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व भुईंज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पूनम झगडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, भुईंज यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मदतीने सोमवार पेठ, फलटण येथे छापा टाकला. सदर कारवाईमध्ये आरोपी अमरदीप संजय गायकवाड, वय ३८ वर्षे व संजय रायबा गायकवाड, वय ६० वर्षे यांच्याकडून ८२,५३०/- रुपये किमतीचा ३ किलो ९३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १,२१,३३०/- रुपये किमतीचा एकूण ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई मा. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा; मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा; तसेच मा. सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पूनम झगडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक; विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा; पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक; सुरज शिंदे, पुजारी, अजित मोरे, स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार; मुलानी, लैलेश फडतरे, रोहित निकम, अरुण पाटील; तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तोडरमल, वैभव टकले, सपोफौ. नितीन जाधव, गणेश घोटकर, पोलीस हवालदार सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते व आकाश कुंभार यांनी सहभाग घेतला.
सदर उल्लेखनीय कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक, सातारा; मा. अपर पोलीस अधीक्षक, सातारा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी कारवाईमध्ये सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
भुईंज पोलिसांकडून अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.





