गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे स्कूलचे विद्यार्थी ठरले विविध शिष्यवृत्तीचे मानकरी.
राज्यस्तरीय परीक्षेत दहा विद्यार्थी चमकले
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचा स्कूलमध्ये उचित सत्कार.
लिंब- गौरीशंकरच्या डॉ. पी.व्ही.सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल, लिंबच्या दहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळून ते शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.महाराष्ट्र शिक्षण परिषद, पुणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती २०२५-२६ परीक्षेत आर्यवीर विक्रम शिंदे याने सी.बी.एस.सी.(CBSE) प्रवर्ग जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये २० वा, सार्थक सुभाष चव्हाण अनुसूचित प्रवर्ग जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ५ वा तसेच भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (आय.ए.एस.) परीक्षा २०२५-२६ अंतर्गत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये इरा रवींद्र चव्हाण हिने राज्यस्तरावर सहावा क्रमांक प्राप्त केला आहे.शरयू संजय चोरट हिने जिल्हास्तरावर पाचवा व अवधूत संदीप विभुते याने आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. याच स्कूलमधील कृष्णाई संतोष साबळे, सर्वेश समाधान भोसले,अनुश्री गणेश फरांदे,आराध्या अमोल जाधव व काव्या श्रीमंत साळुंखे यांनी केंद्रस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्ती पटकविली आहे.या विद्यार्थ्यांनी स्कूलच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल स्कूलमध्ये संस्थेचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण , डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विजय राजे व जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सदरच्या परीक्षा या एम.पी.एस. सी., यू .पी.एस.सी.तसेच एन.डि.ए., रेल्वे,आर्मी,नेव्ही,हवाई दल यांसारख्या स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात.या परीक्षेंसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देतात यामध्ये गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीने गौरवण्यात येते. गौरीशंकरच्या डॉ.पी.व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंब ने यामध्ये बाजी मारली आहे.या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक अमित मडके,अविनाश सावंत,निना जगताप, रुपाली मोरे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप,जयवंतराव साळुंखे,आप्पा राजगे,प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.
दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाची कास धरून गेली तेरा वर्ष अखंडपणे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी ज्ञानाने सक्षम व समृद्ध करण्यासाठी येथील शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.त्यामुळेच विविध स्पर्धात्मक स्पर्धेत येथील विद्यार्थी चमकदार कामगिरी करीत आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे संस्थेचा शैक्षणिक नावलौकिक उंचावला आहे.
मदनराव जगताप अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा.





