अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027 चा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027 चा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027 चा आढावा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’ संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सेवा, निवास व्यवस्था तसेच भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजनातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला असून, भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. महासिंहस्थ कुंभमेळा 2027 यशस्वी आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket