अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ३१ जुलै रोजी मोफत बीएमडी तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ३१ जुलै रोजी मोफत बीएमडी तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ३१ जुलै रोजी मोफत बीएमडी तपासणी शिबिर

सातारा : श्री एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, सातारा यांच्या सौजन्याने शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे हाडांच्या ठिसूळपणाची (Bone Mineral Density – BMD) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे होणार असून, हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती करून ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचे वेळेवर निदान व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या महिला, कॅल्शियमची कमतरता असलेले रुग्ण, वारंवार पाठदुखी, सांधेदुखी किंवा हाडे दुखण्याचा त्रास असलेले रुग्ण, तसेच सर्वसामान्य, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांनी सहभागी होऊन या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ओपीडीसाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईकही या शिबिराचा लाभ घेऊ शकतात.

शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९, ९९२१९९८००० तसेच हेल्पलाईन ९१६८४३२४३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे श्री एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket