अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी ५ वाजता उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी ५ वाजता उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी ५ वाजता उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सातारा -कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, गुरुवार (दि. ३० जुलै २०२६) रोजी सायंकाळी ५.०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी १ फूटाने उघडण्यात येणार असून, त्याद्वारे ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे.

सध्या कोयना पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्यामधून १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण ६,१२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.

दरम्यान, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या आवकनुसार सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket