जंतर-मंतरवरील आंदोलनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या जनसमुदायासमोर आपले विचार प्रकट केले.
उद्धव ठाकरे यांची जंतर मंतरवर उपस्थिती उद्धव ठाकरे म्हणाले की मी या ठिकाणी भाषण देण्यासाठी नाही तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. राजकारणात संघर्ष हा तर रोजच असतो पण आपण कुणासाठी संघर्ष करतोय हे देखील पाहायला हवे.शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर 21 जुलै रोजी आंदोलन केले. त्यावेळी त्यांना सुरक्षा दलांनी काही काळासाठी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी हे आपल्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करुन घेत आहेत.





