अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरच्या विकासकामांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांनी घेतला आढावा; अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

महाबळेश्वरच्या विकासकामांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांनी घेतला आढावा; अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

महाबळेश्वरच्या विकासकामांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांनी घेतला आढावा; अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर शहर व परिसरात झालेल्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. रस्ते, संरक्षक भिंती, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा तसेच भूस्खलनग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री मकरंद आबा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, नुकसानग्रस्त ठिकाणांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी तसेच भविष्यात अतिवृष्टीचा परिणाम कमी करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.

महाबळेश्वरच्या विकासाबरोबरच नागरिकांची सुरक्षितता, दर्जेदार नागरी सुविधा आणि सक्षम पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी मंत्री मकरंद आबा पाटील यांनी स्पष्ट केले. सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी पाटील, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket