अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कास पठारावर दुर्मिळ वनस्पती लागवड व संवर्धन उपक्रम उत्साहात

कास पठारावर दुर्मिळ वनस्पती लागवड व संवर्धन उपक्रम उत्साहात

कास पठारावर दुर्मिळ वनस्पती लागवड व संवर्धन उपक्रम उत्साहात

सातारा -जागतिक नैसर्गिक वारसास्थळ कास पठार येथे दुर्मिळ वनस्पती संवर्धन प्रकल्पांतर्गत विशेष वनस्पती लागवड व संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक मा. श्री. सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आले. 

 सातारा वन विभाग, ‘प्रकृती फेलोशिप’ आणि ‘रानवा’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दुर्मिळ व स्थानिक वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डॉ. अंकुर पटवर्धन यांनी कास पठाराच्या जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक प्रजातींचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काळी निसुर्डी (Adelocaryum malabaricum) व हिरवी निसुर्डी (Adelocaryum lambertianum) या दुर्मिळ एकुण 100 वनस्पतींची लागवड करण्यात येवुन मानद वन्यजीव रक्षक सातारा श्री. सुनील भोईटे यांनी कास पठारासारख्या जागतिक स्तरावर महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रात दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगून अशा उपक्रमात स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचे आवाहन केले.

 या उपक्रमामुळे कास पठारावरील स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जतन करण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे मत उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांनी केले. सदर कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक (वनी.) श्री. प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा (प्रा.) श्री. संतोष पाटील तसेच श्री. प्रकाश शिंदे वनपाल रोहोट, श्रीम. उज्जवला थोरात वनपाल बामणोली , वनरक्षक समाधान वाघमोडे, जयंत निकम, तुषार लगड, व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, कास, एकिव, आटाळी, कासाणी, पाटेघर, कुसूंबी, ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket