हिंदवी स्कूलचे अॅबॅकस स्पर्धेत यश
सातारा ः मुंबई येथे झालेल्या १८ व्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्रियल शिंदे हिने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवला, तसेच समृद्धी शिंदे हिने सातारा विभागातून प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश शिंदे, पृथ्वीराज पाटील, वेद गिरी व प्रियल शिंदे यांनी इंटरनॅशनल ग्रेडिंग परीक्षेमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
प्रियल शिंदे ही विद्यार्थिनी सलग चार वर्ष भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची थायलंड, मलेशिया व सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल ॲबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षिका रेखा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, पंचकोषाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील व शिक्षकांनी अभिनंदन केले.





