अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » महाबळेश्वर तालुक्यातील पार मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी: दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

महाबळेश्वर तालुक्यातील पार मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी: दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

महाबळेश्वर तालुक्यातील पार मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी: दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

महाबळेश्वर:महाबळेश्वर तालुक्यातील मौजे पार येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:२० च्या दरम्यान ही घटना घडली. सुष्मा सुधाकर महामुलकर (वय ४६, रा. मौजे पार) या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्या आपल्या कामासाठी घराबाहेर गेल्या असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, वेल आणि सोन्याची अंगठी असा एकून दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(ए) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket