अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » जावळी तालुक्यातील ओखवडी गावांतील चार शिक्षकांची केंद्रप्रमुख पदी निवड

जावळी तालुक्यातील ओखवडी गावांतील चार शिक्षकांची केंद्रप्रमुख पदी निवड

केळघर -जावळी तालुक्यातील ओखवडी गावांतील चार शिक्षकांची केंद्रप्रमुख पदी निवड झाली असून एकाच वेळी चार शिक्षकांची केंद्र प्रमुख पदी निवड होण्याचे ओखवडी हे राज्यातील बहुदा एकमेव गाव असून या निवडीमुळे दुर्गम ओखवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जावळी तालुक्यात शिक्षक म्हणून काम करणारे शशिकांत शेलार यांची खर्शी बारामुरे केंद्र प्रमुख पदी नियुक्ती झाली असून योगेश शेलार यांची कुडाळ केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून आनंदा शेलार यांची महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात शिक्षक म्हणून काम करणारे विक्रम पार्टे यांची पोलादपूर तालुक्यातील देवळे येथे केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. एकाच वेळी ओखवडी गावांतील चार शिक्षकांची केंद्रप्रमुख पदी नियुक्ती होणे हे गावाच्या व या शिक्षकांच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. ओखवडी हे गाव छोटेशे असले तरी अध्यात्मिक परंपरा जपणारे गाव असून गावाने याआधी एकीच्या जोरावर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना, तंटामुक्त योजना या योजनासह शासनाच्या विविध अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झालेले हे चारही शिक्षक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून उपक्रमशील शिक्षक म्हणून यांची ओळख आहे. या शिक्षकांनी आपापल्या शाळेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी गुणवत्ता यादीत देखील आणले आहेत. ओखवडी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण निश्चित योगदान देऊ अशी ग्वाही नव्याने नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुख शशिकांत शेलार, योगेश शेलार, आनंदा शेलार, विक्रम पार्टे यांनी दिली. ओखवडी गावातील चार शिक्षकांची केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झाल्याने मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket