अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » धुकं, धबधबे अन् हिरवाई… मान्सूनमध्ये साताऱ्याची सफर ठरेल अविस्मरणीय

धुकं, धबधबे अन् हिरवाई… मान्सूनमध्ये साताऱ्याची सफर ठरेल अविस्मरणीय

धुकं, धबधबे अन् हिरवाई… मान्सूनमध्ये साताऱ्याची सफर ठरेल अविस्मरणीय

सातारा -सातारा : पावसाळा सुरू होताच सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा, धबधबे, धरणे आणि हिरवाईने नटलेली पर्यटनस्थळे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतात. धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचा मनमोहक आविष्कार अनुभवण्यासाठी सातारा हा मान्सून पर्यटनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. 

मान्सूनमध्ये आवर्जून भेट द्यावीत अशी ठिकाणे ठोसेघर धबधबा – पावसाळ्यात दिमाखात कोसळणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा. कास पठार – ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान फुलांनी बहरणारे जागतिक वारसा स्थळ. बामणोली व शिवसागर बॅकवॉटर – बोटिंग आणि शांत निसर्गाचा आनंद. तापोळा (मिनी काश्मीर) – हिरवेगार डोंगर, तलाव आणि धुक्याचे अप्रतिम दृश्य.चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प – ढगांमध्ये हरवलेला नयनरम्य परिसर.महाबळेश्वर – पाचगणी – धुक्याने वेढलेले पॉइंट्स, स्ट्रॉबेरी आणि निसर्गरम्य वातावरण. सज्जनगड – अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम. अजिंक्यतारा किल्ला – सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी उत्तम ठिकाण.

पर्यटकांनी पावसाळ्यात पर्यटन करताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. धबधब्यांजवळ सेल्फी काढणे, पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करणे अधिक सुरक्षित ठरेल. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket