श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत युवकांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत युवकांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत युवकांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी

सातारा, दि.25: महाराष्ट्रातील युवकांना रोजगार, कौशल्य विकास तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत विविध नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड या नामांकित संस्थेमध्ये सेल्स अॅड मार्केटिंग पदासाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहे. संबंधित पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ५ जुलै २०२६ आहे.

सदर इंटर्नशिपसाठी उमेदवाराची पात्रता :- भारतीय नागरिक असणे आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे. कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेली असावी. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ९ महिन्यांच्या कालावधीची इंटर्नशिप, दरमहा रु. ९००० इतके विद्यावेतन (Stipend) तसेच एकरकमी रु. ६,००० आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करावे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा (संपर्क क्र. ०२१६२-२३९९३८) येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket