नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एकेज कॉमर्स अकॅडमीचा घवघवीत यशाचा झेंडा; सीए फायनलमध्ये चार विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट

एकेज कॉमर्स अकॅडमीचा घवघवीत यशाचा झेंडा; सीए फायनलमध्ये चार विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट

एकेज कॉमर्स अकॅडमीचा घवघवीत यशाचा झेंडा; सीए फायनलमध्ये चार विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट

सातारा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या सीए फायनल परीक्षेच्या निकालात साताऱ्यातील एकेज कॉमर्स अकॅडमीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. अकॅडमीमधील लौकिक शिंदे, प्रज्ञा जाधव, अनुष्का वाकुर्डे आणि श्रेया शर्मा यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

या यशामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉमर्स क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकेज कॉमर्स अकॅडमी आज सातारा जिल्ह्यात एक विश्वासार्ह दीपस्तंभ ठरत आहे.

या अगोदर लागलेल्या सीए फाउंडेशन च्या परीक्षेत ही अकॅडमीचा विद्यार्थी अभिषेक जाधव याने सीए फाउंडेशन परीक्षेत देशात १२ वा क्रमांक, तर वेदांत जगदाळे याने देशात १९ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

सीए आनंद कासट आणि त्यांच्या अनुभवी टीमच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सीएसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत अकॅडमीने गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे.

अकॅडमीने आजवर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला असून, अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. सीए फायनलमधील या चार विद्यार्थ्यांच्या यशामुळे एकेज कॉमर्स अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket