नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सौरभ नलवडेंच्या उत्तुंग कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो-मदनराव जगताप

सौरभ नलवडेंच्या उत्तुंग कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो-मदनराव जगताप

सौरभ नलवडेंच्या उत्तुंग कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो-मदनराव जगताप

गौरीशंकर च्या चेतना स्कूलचा माजी विद्यार्थ्याचे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदी निवड संस्थेतर्फे उचित सत्कार

सातारारोड- गौरीशंकर चे चेतना इंग्लिश मिडियम स्कूल (भक्तवडी ) सातारारोड येथील शैक्षणिक वर्ष सन २०१४ – १५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी सौरभ सुनील नलवडे यांनी उत्तुंग कामगिरी करून भारतीय नौदल (नेव्ही ) मध्ये त्याची सब लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल नुकताच गौरीशंकर नॉलेज सिटी चे अध्यक्ष मदनराव जगताप यांच्या हस्ते त्याचा उचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, प्राचार्या सविता नलवडे, सुनील नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मदनराव जगताप म्हणाले की सौरभ सुनील नलवडे यांनी प्रतिकूलतेमध्ये प्राप्त केलेले यश निश्चित अभिमानास्पद आहे. राष्ट्र सेवेचे ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

माजी विद्यार्थी सौरभ नलवडे म्हणाला की शैक्षणिक ज्ञानाबरोबरच स्कूल मधून दिले जाणारे राष्ट्रसेवेचे संस्कार माझ्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरक ठरले. सौरभ नलवडे याची नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल सातारारोड मधील पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक करण्यात आले. 

सौरभ नलवडे यांनी प्राप्त केलेल्या याच्याबद्दल संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप ,जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket